शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

राष्ट्रवादी बैठकीत ईव्हीएमचा संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:12 IST

सांगली : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्टÑवादीच्या सांगलीत झालेल्या बैठकीत रविवारी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) संशयकल्लोळ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच यंत्राबद्दलच्या तक्रारींचा पाऊस पडला. शेवटी एकमताने याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.विजय कॉलनीतील राष्टÑवादी कार्यालयात दुपारी राष्टÑवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांचा ...

सांगली : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्टÑवादीच्या सांगलीत झालेल्या बैठकीत रविवारी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) संशयकल्लोळ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच यंत्राबद्दलच्या तक्रारींचा पाऊस पडला. शेवटी एकमताने याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.विजय कॉलनीतील राष्टÑवादी कार्यालयात दुपारी राष्टÑवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. बैठकीला पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठकीत ७० टक्के पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र, अधिकाऱ्यांकडून मिळालेली चुकीची वागणूक, यंत्रणेकडून झालेला त्रास याबद्दल तक्रारी मांडल्या. यावेळी माजी नगरसेविका प्रियांका बंडगर म्हणाल्या की, ज्या उमेदवारांना फारसे कुणी ओळखतही नाही, त्यांना हजारो मते कशी मिळू शकतात. आजवर पोस्टल मतांमध्ये जो कौल दिसतो, तोच मूळ निकालात दिसत असतो, असा अनुभव असताना, यावेळच्या निवडणुकीत पोस्टल मतांच्या कौलाविरुद्ध मूळ निकाल लागल्याचे दिसून येते. हा संशयास्पद प्रकार ईव्हीएममुळे झाला आहे. या यंत्रांनी सामान्य उमेदवारांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे संशयाच्या भोवºयात सापडलेल्या या यंत्रांना हद्दपार करावे.संतोष सुर्वे म्हणाले की, प्रभाग क्र. ३ मध्ये निकालापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी झाली होती. यंत्रांच्या तपासणीबाबत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. यंत्र सील होण्यापूर्वी राष्टÑवादी कार्यकर्त्यांना हाकलले गेले. संपूर्ण यंत्रणाच चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचा संशय आम्हाला असूनही आम्ही काही करू शकलो नाही. प्रचंड दबाव शासकीय यंत्रणेवर असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यामुळे या यंत्रांची तसेच एकूणच यंत्रणेची चौकशी आयोगाने करायला हवी. एका कार्यकर्त्याने प्रभाग १२ मध्ये बाहेरील प्रभागातून आलेल्या नसिमा शेख यांना मिळालेल्या मतांकडे लक्ष वेधले. ज्या उमेदवारांना लोक ओळखतही नव्हते, त्यांच्या पदरात इतकी मते आलीच कुठून?, असा सवाल उपस्थित केला. अनेक प्रभागातील लोकसुद्धा या निकालाने अवाक् झाले आहेत. त्यांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पहिल्या अनेक फेºयांमध्ये आघाडीवर असलेल्या उमेदवारांना शेवटच्या तीन फेºयांमध्ये अचानक कशी मते वाढतात?, असा सवालही उपस्थित केला. बैठकीस माजी महापौर सुरेश पाटील, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, विनया पाठक, धनपाल खोत आदी उपस्थित होते.आयोगाकडे तक्रार करणार!राष्टÑवादीचे सर्वच नगरसेवक व पराभूत उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम यंत्राबद्दल तसेच एकूण यंत्रणेबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात व्हीव्हीपॅट किंवा मतपत्रिकांचा वापर निवडणूक आयोगाने याठिकाणी करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. संशयास्पद वाटणाºया निकालांविषयी अपील दाखल करून शक्य तिथंपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या सोमवारीच तातडीने याबाबतचे पत्र तयार करून त्यावर सर्वांच्या एकत्रित स्वाक्षºया घेऊन तक्रार करण्यात येणार आहे.